Tag: MARATHI LITERATURE

  • झालर काळी – ZALAR KALI(BLACK FRILL)

    पापणीस तव झालर काळी थरथरणारी अतीव सुंदर नकोस मिटवू उघड पाकळ्या कमलदलांसम सजीव सुंदर कधी वाटते खूप रडावे कारण त्याचे नकळे मजला अश्रु-विमोचन करता फुलते अंतरातली उणीव सुंदर मन घाबरते वादळ येता मेघ सावळे मनी दाटता कोसळतो मग तांडव करुनी हवाहवासा वळीव सुंदर शीळ घालतो अवखळ वारा श्यामल शीतल मेघ नाचरे बरसुन विणती अवनीवरती मोर…

  • घर कौलारू – GHAR KOULARU(TILED ROOF HOUSE)

    ओठांमध्ये पालवलेले बोलायाचे आहे मजला चित्रामध्ये आठवलेले रेखायाचे आहे मजला चितारते मी सागर नयनी मिटते डोळे गाज ऐकुनी डोळ्यामध्ये रंगवलेले वाचायाचे आहे मजला रंग-गंध वेचून फुलांचे मधुसंचय मी करित राहिले श्वासामध्ये साठवलेले प्राशायाचे आहे मजला शेकोटीची उब जांभळी शब्द कापरे तप्त जाहले काव्यामध्ये तापवलेले ओतायचे आहे मजला तव झुळकीने मोहरलेल्या कळ्याफुलांचे मुग्ध रंग हे हृदयामध्ये…

  • चांदोबा – CHANDOBA(MOON)

    ती कशास हे काळिज चाळत बसते अन स्वप्नांचे दुकान मांडत बसते ती स्वप्ने ओली चुलीत ना जळती मग त्यांना ती उन्हात सुकवत बसते जाऊन पुन्हा मी लिंबोणी मागे तो चांदोबा नभात शोधत बसते हे शब्द नाचरे फिरती अवती भवती मी शिताफिने गळात ओढत बसते ती मूढ ‘सुनेत्रा’ मौन घेतसे म्हणुनी मी ओठांना तोरण लावत बसते

  • चिमण-पाखरा – CHIMAN-PAKHARA(LITTLE BIRD)

    थांब जरा तू चिमण पाखरा या चाफ्याच्या झाडाखाली विशाल घरटे जरी तुझे रे आकाशाच्या झाडाखाली हे पाणी अन हा वारा ना कुण्या एकट्यासाठी वाहे भामेपरि मग उदास का तू प्राजक्ताच्या झाडाखाली प्राशुन घे तू गंध फुलांचे मुग्ध निरागस हसणे त्यांचे मातीसम मग गंधवती तू या प्रेमाच्या झाडाखाली तुझ्या पाकळ्या दिसती लोभस स्पर्श एकदा करू काय…

  • पृथ्वी आहे गोल सख्या रे – PRUTHVI AAHE GOL SAKHYA RE(FRIEND..EARTH IS ROUND)

    किती दिवस मी रदीफ व्हावे बोल सख्या रे मीच काफिया ओळख माझे मोल सख्या रे कशी अवेळी साद घालते कविता वेडी सावर मजला जातो माझा तोल सख्या रे ते तेव्हाचे गीत गुलाबी अता हवे मज हवेहवेसे बुडवी मज ते खोल सख्या रे दिवस संभ्रमित हे पण सरतिल मेघ वर्षतिल स्मरण ठेव तू पृथ्वी आहे गोल…

  • गुलाब तो तर – GULAB TO TAR( ROSE FLOWER)

    कशास जाशिल तिथे अता तू विस्कटलेली पिसे बघाया लपवुन काळे धवल परांनी खोटे खोटे उगी रडाया डोळ्यांमधले खारे पाणी असते अपुल्या रडगाण्याचे भरून ठेवा मिठागरातुन  अळणी भोजन बरे कराया प्रीती म्हणजे नव्हे मोगरा गुलाब तो तर काट्यामधला गाली नाही नेत्री फुलतो हृदय घेउनी येच पहाया तुझी आसवे इतुकी निर्मल वाहुन नेती मीपण अवघे शिंपल्यात ती…

  • उत्सव – UTSAV(FESTIVAL)

    कुणाकडे ती पाहुन हसली वदला उत्सव जाता जाता वाटेवरती अडला उत्सव मी असताना हवा कशाला गुलाब हिजला? खोटे खोटे बागेवरती रुसला उत्सव वसंतातही मोहरलेल्या फांदीवरुनी शिशिरामधल्या पानांसम टपटपला उत्सव चिवचिवते अन उगाच फिरते घरट्याभवती त्या चिमणीच्या बाळापरि किलबिलला उत्सव कळ्या फुलांना कोण सांगतो नटावयाला चिडवुन त्यांची फिरकी घेता खुलला उत्सव लेकुरवाळी वेल हासरी डोलत आहे…