शीर्षक एकचा पाढा
एक एके एक
आत्मा एक
एक दुणे दोन
जीवात्मा दोन
एक त्रिक तीन
रत्नत्रय तीन
एक चोक चार
अनुयोग चार
एक पंचे पाच
परमेष्ठी पाच
एक सख सहा
द्रव्ये सहा
एक साती सात
तत्त्वे सात
एक आठे आठ
अष्टद्रव्य आठ
एक नव्वे नऊ
जिनायतं नऊ
एक दाही दहा
दशधर्म दहा
एक आकरे अकरा
आगम अंग अकरा
एक बारे बारा
संवशरण भाग बारा
एक तेरे तेरा
अरिहंत गुणस्थान तेरा
एक चौदे चौदा
आगम पूर्व चौदा
सिद्ध स्थान चौदा
त्याचा नको सौदा