दीक्षा म्हणजे नाही बंधन स्याद्वादातिल सत्य जाणते
आत्मघात हा अतीव घातक स्याद्वादातिल सत्य जाणते
सत्य झळकण्या हृदयी दीक्षा उत्साहाची देह रक्षिण्या
जगावयाची इच्छा सुंदर स्याद्वादातिल सत्य जाणते
तिरकी बुद्धी कुटील नीती टवाळकीचा जिवास धोका
कर्म कराया कर्तव्यास्तव स्याद्वादातिल सत्य जाणते
मार्दव आर्जव शुचिता संयम क्षमा धर्म गुण आत्महितैषी
स्पष्ट बोलते हृदयापासुन स्याद्वादातिल सत्य जाणते
स्वभाव आहे मातृधर्म मम पुरुषार्थाने घडे “सुनेत्रा”
अंतरातली श्रद्धा सम्यक स्याद्वादातिल सत्य जाणते