जिनायतन – JINAYATAN


आस्वादात्मक जरी समीक्षा
शास्त्रार्थाने खरी समीक्षा

साहित्यिक भाषेत जिव्हाळा
पाखडते वैखरी समीक्षा

हास्यरसाचे तुषारसिंचन
झेंडूची टोकरी समीक्षा

काट्याने लक्ष्यास भेदते
उपजत रूपांतरी समीक्षा

लोखंडाचा गंज प्यायली
झुळझुळते निर्झरी समीक्षा

उल्यास सानी करून झटपट
देय मना तरतरी समीक्षा

मुसळधार चैत्रातिल चंदन
जिन खुद ब्रम्हा हरी समीक्षा

खणून काढे पैलू पाडे
अव्वल धन जौहरी समीक्षा

धुंवाधार सोन्याच्या गारा
भरावया अंबरी समीक्षा

जिनायतन मम शांत रसाचे
नेत्रांकित अक्षरी समीक्षा

संदर्भे संपृक्त “सुनेत्रा”
तरही वरची तरी समीक्षा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.