-
सुंदर माय – BEAUTIFUL MOTHER
In this poem poetess meets her beloved mother in the dream. This dream is described in this poem. स्वप्नामध्ये काल भेटली, स्वप्नसखी मज सुंदर माय ! उरी उरी मग भेटुन तिजला , रडलो दोघी धाय धाय!! तेच प्रेम अन तोच जिव्हाळा , अंतरातुनी फुटे उमाळा … उसळुन आल्या भरतीच्या लाटा!!! मुक्त कराया प्रेमाच्या वाटा…. उठेल…
-
सृजनाचा हुंकार – VOICE OF CREATION
दिवसामागुन दिवस उलटले महिने वर्षे किती नेमे येते नवे वर्ष हे कौतुक त्याचे किती क्याटरिना अन रिटा सुनामी गर्जत हे आले बेचिराख जरी जीवन झाले राखेतुन फुलले शिशिरामध्ये झडती पाने वसंत देतो फुले जुन्या क्षणांच्या हिंदोळ्यावर पुन्हा नव्याने झुले तोच सूर्य अन तोच चंद्रमा रोजच भासे नवा चैतन्याची खूण ओळखा हृदयामधला दिवा मातीमधुनी पुन्हा थरथरे…
-
सुंदर घुमविती घागरी – TO MOVE THE POTS
रंग कणिका अंबरातल्या उधळिल्या सागरी सुंदर घुमविती घागरी घागरी घुमविती घागरी यज्ञ पेटला संधीकाली लोभ-मत्सरा जाळे होळी बालके वाजविती भेरी सुंदरा…. ठिणग्या बरसत वीज नाचते धरणीवरती अंबर झुकते लालस पिवळी हिरवी निळसर भक्तिची वस्त्रे जरतारी सुंदरा ….. पाहून उत्सव नभ हे हसले गर्जत गर्जत मेघ वर्षले मृदगंधाने झेले भरले बाग उमलली धरेवरी गं धरेवरी
-
स्पंदन – VIBRATION
-
मृद्गंधाचा मस्त धुमारा – SMELL OF WET SOIL
-
बाळाचं बोरन्हाण – BABIES BERRY BATH
बाळ आमचं शोनुलं कुरळ्या केसाचं तान्हुलं बाळाचे डोळे हसणारे कान अंगाई ऐकणारे बाळाचं नाक चाफेकळी हनुवटीवर खोल खळी गुलाबाची पाकळी बाळाचा रंगीत पाळणा जणु आजीचा झोळणा झबलं बाळाचं झालरीचं कुंचीवर चित्र मोराचं बाळाचं बोरन्हाण आहे आज पाहुण्या जमल्यात खास खास बाळाला म्हणतात हास हास दरवाजाला लावल्यात झावळ्या बोरांनी भरल्यात रोवळ्या आत्या आज्जी मावशी मामी यांनी…
-
मज्जा करूया! – WILL MAKE FUN
उन्हाळ्याची सुट्टी आली; मज्जा करूया! सोसायटीच्या पार्किंगमध्ये, चेंडू खेळूया! प्लास्टिकचा हा चेंडू बघा टप्पे घेत नाही, लोखंडाचा चेंडू तर- उडतच नाही. आपला रबरी चेंडू पळे किती- थांबतच नाही. पकडुन आपल्या चेंडूला टप्पाटप्पी खेळू; जास्त टप्पे कोणाचे ते- भराभरा मोजू. कोण जिंकलं? कोण हरलं? वादावादी नको; सुट्टी संपेल भांडा-भांडीत- वाद आता नको. आज जिंकू,उद्या हरू, परवा…