-
पद्मावति – PADMAAVATI
नको लिहू तू, नको श्रमू तू, गझला कोणी, तुझ्या विके घडीभराचा, घेच विसावा, पुढे दाटले, गच्च धुके हळूहळू अरुणोदय होइल, शांत झोपल्या, धरेवरी दिशा स्वतःही, निघे पूजना, वस्त्र तिचे मृदु, धूत फिके स्वच्छ झाडल्या, पदपथावरी, प्राजक्ताचा, सडा पडे भल्या पहाटे, वेचत पुष्पे, कोणी बालक, गणित शिके पालखीत वनदेवी बसता, चवऱ्या ढाळी, रानजुई स्वागत करण्या, पद्मावतिचे,…
-
नवनवोन्मेष शालिनी – NAV NAVONMESSHA SHAALINEE
नवनवोन्मेष शालिनी मम प्रतिभा वरदायिनी ।धृपद। नऊ रसांचे पान करोनी नव रंगांची उधळण करुनी तृप्त हसे शरदिनी ।१। मधुघट भरले पावित्र्याने सतार दिडदा गाते गाणे मयुर नाचतो वनी ।२। शेवंती अन झेंडू माला आम्रपर्णयुत तोरण दारा रांगोळी अंगणी ।३। अम्बरातले चंद्र चांदणे बिंब जलातिल लोभसवाणे शुभ्र किरण कुमुदिनी ।४। निळे सरोवर भरून वाहे हंस हंसिनी…
-
मस्त मस्त पावसात – MAST MAST PAVASAAT
मस्त मस्त पावसात सख्या फिरू वारियात पांघराया शाल हवी तनू म्हणे गारव्यात नाचू पाय आपटीत वाळूवरी अंगणात रेतीमध्ये तळपाय बुडवूया खोल आत चिमणीचा खोपा बांधू झाड लावू परसात नांद्रूकीच्या फांदीवरी झोके घेऊ झुलूयात बाजगरी ऐसपैस चल गप्पा मारुयात भिजलेल्या वाटांवरी रवापाणी खेळूयात दिसता तो फरूड गे वाघ त्याला म्हणूयात चंदनाच्या पाटावर काचापाणी खेळूयात सये चल…
-
सण रमझान – SAN RAMZAAN
श्रावण मासी सण रमझान करूया आनंदाचे पान श्रावण धारा बरस बरसती चिमण पाखरे चिवचिवती क्षीरकुर्मा अन मधुर मिठाई खात गाऊया मंजुळ गाणी मोद वाटूया निसर्गातला निसर्ग फुलण्या छान करूया आनंदाचे पान श्रावण मासी सण रमझान
-
वृक्षवल्ली – VRUKSH- VALLEE
अंगणात आल्या सरी आषाढाच्या वांड पोरी गळा मौक्तिकांच्या माळा पायी घुंगराचा वाळा पाखरांचे थवे गाती ढगांमध्ये उंच जाती जाई जुई चाफा कुंद सुगंधाने मन धुंद हवा जरी गार गार आजाराचा गेला भार फुलापरी मन ताजे गीत प्रीतीचेरे गाजे अता नाही घातपात जगू सारे मस्त शांत मधुमिलनाची घडी उमलली गुलछडी नाही अंगी कसकस जीवनात नऊ रस…
-
कॅमेरे – CAMERE
बास झालं लिहिणं बिहिणं चल आता हुंदडायला अंगणातल्या झाडावरचे पिवळे गुलाब मोजायला उमलते गुलाब टपोऱ्या कळ्या खिदळतात हसतात वेड्या खुळ्या डोळ्यांचे कॅमेरे दोन दोन फुलांचे फोटो घेतंय कोण हिरव्या पोपटी पानांवर गुलाबाच्या गालिच्यावर प्रेम तुझं नि माझं हसतंय पाकळी पाकळ्यांवर तेवढ्यात आल्या कित्ती बाया साळकाया अन माळकाया फुलं तोडून पसार झाल्या माझं हसू घेऊन गेल्या…
-
कविता रडली – KAVITAA RADALEE
माझ्यामध्ये गझल उमटली तुझ्यामुळे पण कविता रडली रडता रडता हसू लागली टपोर मोती उधळत खुलली फुलली गळली पुन्हा प्रकटली मुग्ध कळ्यानसम लाज लाजली लाजेचीही लाज वाटता ठिणगीसम ती फुलू लागली पाऊस पाडून मग ठिणग्यांचा लज्जेला ती जाळत गेली निर्लज्जांसम निडर बनली वीज होऊनी गगनी गेली मेघांना ती चोपून आली झरझर धारा वर्षत असता त्यांच्यासंगे नाच…