-
टकाटक – “In full swing”
बाया बापे बनुन टकाटक आले लावण करावयाला चिखलामधली रोपे उचलत पावसात तनु भिजावयाला इरली डोईवरती त्यांच्या रंगबिरंगी किलतानाची कधी न वाटे भीति तयांना अस्मानीच्या सुलतानाची शेतामध्ये उभ्या आडव्या करून ओळी अंतर राखत धारांमध्ये न्हात कुणबिणी गाती गाणी रोपे लावत हरेक तरुला वाढायाला जागा मिळुदे डुलावयाला प्रकाश पाणी यांच्यासंगे वारा मिळुदे डुलावयाला वेगे वेगे उंचच जावे…
-
ठिपके – Grid of dots
कुरणांवरती मेंढ्या फिरती ओढ्याकाठी गळ्यातल्या घंटा किणकिणती ओढ्याकाठी निळ्या पर्वती प्रभा पसरली उजळत माथे इवले इवले ठिपके चरती ओढ्याकाठी कुठे बैसला मेंढपाळ वाजवीत पावा मऊ घोंगडे खांद्यावरती ओढ्याकाठी गवतावर फुलपाखरे जांभळ्या पंखांची पंख झुलवुनी मजेत उडती ओढ्याकाठी खळाळते जल त्या तालावर वारा गाई काठावर मासोळ्या दिसती ओढ्याकाठी होड्या बनवुन जली सोडुनी खिदळत खिदळत सान बालके…
-
शांतरसमय – “full of peace”
बरसत्या धारांमधूनी नाद ऐकू येत आहे शांतरसमय सागरी लाटांमधूनी गाज ऐकत वात वाहे शांतरसमय चालली वारी पुढे ही रंगल्या भक्तांसवे या पंढरीला सोहळा भिजल्या मनांचा सावळा आषाढ पाहे शांतरसमय भावघन श्रद्धा म्हणोनी शब्दधन मी मुक्त सांडे लेखणीतुन बाग मग सारस्वतांची माझिया काव्यात नाहे शांतरसमय बांधुनी तालासुरांनी अक्षरे लय साधणारी गीत बनता बंदिशीतिल राग माझ्या अंतरी…
-
तीर्थङ्कर- TIRTHANKAR
कमलासनात लक्ष्मी.. पद्मावती देवी… खळाळणारा झरा.. प्रपातातही देवी…. गणेशरूपी ऋद्धी.. मंतर गुणी सिद्धी घडा जलाने भरते.. जिंकुनी घन युद्धी ङ्ग् वांङ्मय जणु जिनचंद्र..जिनवाणी अक्षरबद्ध कमलासनात लक्ष्मी …………कमलासनात लक्ष्मी ………… चरखा फिरतो गरगर.. सूत कातण्या छान छबी आरशातली.. पाहुनी पान जटाभार डोंगरी.. त्यातून ठिबके नीर झरा बनुनी धबधबा.. सांडतो धवल क्षीर ञ ञकार हे अधिपती.. आहे…
-
चल चल पृथवे – CHAL CHAL PRUTHVE
चल चल वाऱ्या माझ्यासंगे वेळुबनातुन धावायाला शीळ घाल तू साद द्यावया … माझ्यातिल लपल्या गाण्याला…. चल चल पाण्या माझ्यासंगे झरा होउनी बागडण्याला खळखळ खळखळ मुक्त नाच तू… माझ्यामधली प्रीत नाचण्या चल चल बिजले माझ्यासंगे मेघांमधुनी कडाडण्याला चाबुक फिरवित कडाड वीजे … माझ्यामधुनी वीज फिराया…. चल चल आभाळा मजसंगे क्षितिजावरती झुकावयाला झुकता झुकता हळू चूंब तू…
-
म्हातारी – MHAATAAREE
आले आले वादळ वारे उडतो पाचोळा भिजावयाला चिंब पावसी मन झाले गोळा काळे काळे मेघ दाटले पश्चिम क्षितीजावरी संथ मंद वाऱ्याच्या झुळकी झुळझुळती भूवरी नभात पक्षी उडू लागले गाठाया झाडे घरट्यामध्ये परतून आली किती चिमणपाखरे सैरावैरा धावत धावत ढग झाले गोळा भरून गेला आभाळाचा फलक निळा सावळा सुटले वादळ देत इशारा झाडांना अवघ्या खिडकीमधुनी शिरला…
-
आधी वादळ – AADHEE VAADAL