Tag: Marathi Nisarga-kavita

  • जलद तोटी – JALAD TOTEE

    कश्शाला पाऊस पडेल सांगा कशाला पाऊस पडेल बाई हृदय भरून येतच न्हाई वाऱ्याची झुळूक चुंबत नाही सच्छिद्र देह झरत नाही डोळ्यात आसवे भरत नाही पापण दले हलत नाही पाऊस थेंब पडत नाही लिहीग सई काहीबाही लिहित रहा टपोर गाणी दवाच्या बिंदूंचे साठव पाणी मिसळ त्यात गारांचे पाणी बुडव तयात मातीचे हात सारव तयांनी अंगण गात…

  • ट्विटर – TWEETER

    सकाळी सकाळी काऊ साद घाली हाक ऐकुनी ती मला जाग आली हवा पावसाची किती छान वाटे फुलांभोवतीचे जणू रम्य काटे घटा सावळी ती जशी कृष्णबाला कुणी घातल्या या नभी मेघमाला बाग नाचते ही स्वैर वारियाने कुहुकार केला तिथे कोकिळाने ट्विटरच्रिपर ट्विटरच्रिपर नाद वेगळे हे घुडू घुडू खुडू खुडू बोल आगळे ते पावसाच्या स्वागताला पाखरे गाताती…

  • परडी – PARADEE

    काव्यपरीचे, चरण पकडुनी, प्राप्त जाहले, सौख्याला; निंदा गर्हा, करुन स्वतःची, फक्त शरण मम, आत्म्याला.. तळ गाठाया, आत्मसागरी, उतरत गेले, खोल खरी; तटस्थ राहुन, निरखित गेले, भोवतालची, मूक दरी.. गांभीर्याने, अन धीराने, दिवा उजळिता, गाभारी; श्रद्धापूर्वक, मिटल्या नेत्री, मी जीवाची, आभारी.. भिऊन ज्यासी, बंद कवाडी, कोंडत गेले, काव्याला; ती भीती भय, सुंदर मम सय, पहा कळाले,…

  • कोण – KON

    गडगड गगनी हसतो कोण नभात मोती दळतो कोण ढगात कापुस भरतो कोण घनामधूनी झरतो कोण पहाट फुलता वाटत मोद फुलांमधूनी हसतो कोण निळ्या समुद्रा भेटायास नदीत लाटा भरतो कोण अंधाराला भेदायास विजेस लखलख म्हणतो कोण जहाज गलबत हलवायास शिडात वारा भरतो कोण वळीव येता भिजावयास चल चल मजला म्हणतो कोण मात्रावृत्त – (८+७=१५ मात्रा)

  • चल चल भिंगू – CHAL CHAL BHINGOO

    चल चल भिंगू म्हणत म्हणत हा फिरे गरारा वारा नका नका रे नावगाव पुसु असो मतलई खारा ताप तापते ऊन उकळते वरवर चढतो पारा हलके हलके सरसर येती भरभर तडतड गारा अंगांगावर रोम शहारा घळघळ सरसरणारा थेंबामध्ये चिंब बिंब तन झेल झेलते धारा भुरे पाखरू किलबिल करुनी तोडे फोडे कारा हूड वासरू चरते खाते हिरवा…

  • मनभावन सृष्टी – MANBHAAVAN SRUSHTEE

    मी कविता अन मी कवयित्री प्रतिभा मम आई विषय न कुठला वर्ज्य असे मज मी ठाई ठाई नकाच घालू मज अंगावर प्रासांचे दागिने पुरे जाहली सक्ती ऐश्या वृत्तातच उडणे नकाच शोधू माझ्यामध्ये जड जड प्रवृत्ती स्वच्छंदी मी चंडोलासम निर्भर मम वृत्ती चैतन्याला उडव उडवण्या मनभावन सृष्टी गाज अंतरी गर्जायाला प्रेमाची वृष्टी लिहिता लिहिता उसळत नाचत…

  • सुंदर सुंदर – SUNDAR SUNDAR

    आज दिवस सौख्याचा सुंदर उजळुन जाईल मनीचे अंबर किणकिण मंजुळ गाईल झुंबर हसेल मम नेत्रांचे मंदिर सर पुण्याची येईल सरसर पापांची मग मिटेल घरघर शुद्ध सरींनी भिजेल अंतर निसर्ग गाणे म्हणेल सुंदर सुंदर सुंदर अतीव सुंदर