-
मनभावन सृष्टी – MANBHAAVAN SRUSHTEE
मी कविता अन मी कवयित्री प्रतिभा मम आई विषय न कुठला वर्ज्य असे मज मी ठाई ठाई नकाच घालू मज अंगावर प्रासांचे दागिने पुरे जाहली सक्ती ऐश्या वृत्तातच उडणे नकाच शोधू माझ्यामध्ये जड जड प्रवृत्ती स्वच्छंदी मी चंडोलासम निर्भर मम वृत्ती चैतन्याला उडव उडवण्या मनभावन सृष्टी गाज अंतरी गर्जायाला प्रेमाची वृष्टी लिहिता लिहिता उसळत नाचत…
-
सुंदर सुंदर – SUNDAR SUNDAR
आज दिवस सौख्याचा सुंदर उजळुन जाईल मनीचे अंबर किणकिण मंजुळ गाईल झुंबर हसेल मम नेत्रांचे मंदिर सर पुण्याची येईल सरसर पापांची मग मिटेल घरघर शुद्ध सरींनी भिजेल अंतर निसर्ग गाणे म्हणेल सुंदर सुंदर सुंदर अतीव सुंदर
-
दिसू लागला – DISOO LAAGALAA
दिसू लागला स्वच्छ किनारा ध्वज फडफडणारा दिसू लागला शांत किनारा बेटावर किल्ला दिसू लागला बुरूज दगडी माडांची वाडी दिसू लागल्या काजू बागा करवंदी मेवा पाण्यावरचा तरंग इथल्या गात पुढे जावा हरेक अधरांवरती वाजो हृदयातिल पावा जीव येथल्या मातीमधला मोक्षाला जावा प्रेमामध्ये सौख्यामध्ये चिंब चिंब न्हावा
-
विश्वचि अवघे माझे – VISHVACHI AVAGHE MAAZE
पानापानावर तरुणांनो लिहा स्वतःची गाणी आठवणींची फुले निरागस फ़ुलतिल पानोपानी दोनच पानामध्ये लपुनी कळ्या पाहती बागा फुलण्यासाठी तापतापुनी कधी न करिती त्रागा ऋतू कोणता आहे त्यांना घेणेदेणे नाही उमलुन येती हृदय उमलता बोलत काहीबाही सहज चुंबितो गूज सांगतो शीळ घालतो वारा अंबरातुनी रातराणिला साद घालतो तारा माझे माझे म्हणू कशाला विश्वचि अवघे माझे पुनव अमावस…
-
नदी फुलांची – NADEE FULAANCHEE
रंगबिरंगी नदी फुलांची वहात आहे काठावरची हिरवाई ती पहात आहे बुडी मारुनी पुष्पांमध्ये बुडून जावे अश्या आगळ्या विचारात मी नहात आहे निळसर कुसुमे दाट निळेपण कुठे चालले शुभ्र गुलाबी बुके त्यातही वहात आहे तशीच काही तरल गझल मम मनात माझ्या बनून कविता पुढे पुढे बघ वहात आहे …
-
शुभस्य शीघ्रम – SHUBHASYA SHEEGHRAM
इतुक्या सुंदर भूमीवरती जगावयाला मिळते आहे भाव फुलांचा तयात दरवळ भरावयाला मिळते आहे लाल असुदे अथवा काळी भूमी प्रसवे वृक्ष लतांना उलते फुलते अंकुर जपते उदरभरण प्राण्यांचे करण्या काठावरती वसोत वाड्या सरिता दुहिता अखंड वाहो नीर तिच्यातील शुद्ध ठेवण्या मती आमुची तत्पर राहो अभयारण्ये हिरव्या राया वन्य जिवांना मुक्त फिराया प्रकृतीतल्या अन्न साखळ्या रहो सलामत…
-
अक्षर माझे – AKSHAR MAZE
वाटुन पाला मी मेंदीचा तळहातांना रंगविले जास्वंदीच्या चुरुन पाकळ्या गालांना मी रंग दिले तेल तुपाची धरुन काजळी नेत्र पाकळ्या लांबविल्या विडा चघळुनी त्रयोदशगुणी अधर पाकळ्या खुलविल्या जाइजुईचा गजरा गुंफुन सुवासिक मम कुंतल झाले निशिगंधाचा सुगंध प्राशुन तनमन अवघे पुलकित झाले शुभ्र मोगरा हिरवा चाफा भूचंपक तो जर्द जांभळा दौतीमध्ये भरण्या शाई प्राजक्तासम टपटप झरला मोरपिसाची…