Tag: MARATHI POETRY

  • मानाचा श्रावण – MANACHA SHRAVAN (prestigious Shravan month)

    मानाचा श्रावण येणार बाई मानाचा श्रावण देणार बाई हेवेदावे मनातली ग कटुता मानाचा श्रावण नेणार बाई पाऊस नक्षत्रांसम मूळ रूप मानाचा श्रावण वेणार बाई अनुराधा मघा हस्त बाळलेणी मानाचा श्रावण लेणार बाई ओंजळी भरून मौक्तिक प्रीतीचे मानाचा श्रावण घेणार बाई गझल मात्रावृत्त (मात्रा १९)

  • दिव्यांची अवस – DIVYAANCHEE AVAS (new moon day of lamps)

    दिव्या-दिव्यांची अवस देखणी गुणानुरागी सरस देखणी सोमवती देवीस निघाली फेडायाला नवस देखणी बालक पालक आषाढाची कथा ऐकती सुरस देखणी शुद्ध भूवरी पाऊस धार जन्मा येण्या हवस देखणी रानामध्ये बांधावरती तरारली बघ जवस देखणी गझल मात्रावृत्त (मात्रा १६)

  • चौकट – CHOUKAT (frame)

    तरही गझल गझलेची पहिली ओळ गझलकार इलाही जमादार यांची. तसा कुणाच्या चौकटीत तो बसला नाही तरी कुणाला अंगणातही दिसला नाही फुलाफुलांची अंगणातली रांगोळी ही तिला जपाया पावसातही फसला नाही हवेहवेसे रंग फासुनी भिजवुन मजला कधीच माझ्या चौकटीत तो घुसला नाही जरी नव्याने चौकटीतल्या विश्वी रमले तरी कधीही मूक होऊनी रुसला नाही कसे हसावे हेच शिकविले…

  • खरे बोलणे – KHARE BOLANE (speaking truth)

    तरही गझल – खरे बोलणे वेड आहे खरे (गझलेची पहिली ओळ,ऋतू हा फुलांचा तुझ्यासारखा…आदरणीय कवी राज पठाण यांची) ऋतू हा फुलांचा तुझ्यासारखा कसा रोज वाटे नव्यासारखा झरोक्यातुनी चंद्र दिसतो मला जणू सोनचाफा दिव्यासारखा जुळे भाव ना पण जुळे काफिया थकुन शेर बैसे खुळ्यासारखा पुसावी लिहावी गझल मी सदा तुझा शेर यावा निळ्यासारखा निळ्या या नभाची…

  • विश्वास – VISHVAAS (faith)

    तरही गझल (मूळ गझल – अरे रावणा हा झमेलाच आहे गझलकार – विनोद अग्रवाल) गझलेची पहिली ओळ कवी विनोद अग्रवाल यांच्या गझलेची. अरे रावणा हा झमेलाच आहे     तुला जाळते की मला जाळते मी तुझी खाक लंका जरी होत आहे तिची राख माझ्या तना फासते मी तुझ्या वीस नेत्री निळ्या अग्निज्वाला जश्या आश्विनाच्या झळा पोळणाऱ्या…

  • महास्कंध – MAHA SKANDHA (BATHOLITH)

    स्थूलपणा पुदगल द्रव्याचा चौथा पर्याय सूक्ष्मपणासम ढोबळ त्यातिल प्रकार दो जाण सर्वांमध्ये अधिक स्थूल जो समस्त जगतात जगास व्यापे पूर्ण असा जो तोच महास्कंध आंब्याहुनही स्थूल खरबूज त्याहुन टरबूज टरबूजाहुन स्थूल शोधण्या आपेक्षिक स्थूल महास्कंध अन आपेक्षिक हे विभाग दो जाण स्थूलपणाला जाणायाला उपयोगी फार २५ मात्रा

  • वरवंटा – VARVANTA (ROLLING PESTLE)

    वाटण घाटण मजेत करतो पाटा वरवंटा सहज फिरे पाट्यावर सर सर माझा वरवंटा पुरण वाटतो कधी खोबरे कधी कधी चटणी हरेक कामामधे साथ दे आता वरवंटा पुरणयंत्र अन मिक्सर सुद्धा हेच काम करती त्यांच्यासम बघ कुशल कितीहा जाडा वरवंटा नका धुण्याला बडवू मजवर म्हणे तुम्हा पाटा बिजली जेव्हा गायब होते काढा वरवंटा हरेक यंत्रासंगे दोस्ती…