Tag: MARATHI POETRY

  • मला आवडे – MALA AVADE (I LIKE )

    मला आवडे ग लिहायास काही तिला आवडे ग जपायास काही कुणी आवडेल तिलाही दिवाना फुला आवडे ग पहायास काही रुमालावरी न रुमालात पक्षी भला आवडे ग भरायास काही नको ते रितेपण वाट्यास तिचिया जिला आवडे ग विणायास काही धुंवाधार श्रावण आषाढ झिमझिम जला आवडे ग धरायास काही गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १९) लगावली – लगागा/लगाल/लगागा/लगागा/

  • जांभळ्या – JAANBHALHYAA (deep purple coloured)

    कळ्या गुलाबी लाल केशरी शुभ्र जांभळ्या कळ्या नवाबी लाल केशरी शुभ्र जांभळ्या भाव सांडती नेणिवेतील जाणिवेतील कळ्या शराबी लाल केशरी शुभ्र जांभळ्या सुरभित करिती परिसर पावन रंगबिरंगी कळ्या शबाबी लाल केशरी शुभ्र जांभळ्या हजर जाहल्या हजरजबाबी बोल उधळण्या कळ्या जबाबी लाल केशरी शुभ्र जांभळ्या कानामध्ये सांगतिल मज कशी बोचली कळ्या खराबी लाल केशरी शुभ्र जांभळ्या…

  • घर – GHAR (Home)

    चंदेरी सोनेरी श्रावणसरी चंदेरी सोनेरी साधन सरी माझे हे सुंदर घर मुक्त होण्या चंदेरी सोनेरी तारण सरी नाचाया बहराया मुग्ध धरणी चंदेरी सोनेरी कारण सरी आत्म्याला चिंब चिंब करावयास चंदेरी सोनेरी पावन सरी आकाशी जलदातुन मौक्तिकांच्या चंदेरी सोनेरी साजण सरी गझल मात्रावृत्त (मात्रा १९, ६/६/७/)

  • गंधोदक – GANDHODAK (SACRED FRAGRANT WATER)

    मी आहे जादूई चुंबक खेचुन घेते सुंदर रंजक अतीव सुंदर मजला मिळते झुलावया हृदयाचा लंबक हृदय प्रीतिने भरून वाहे पूर्ण उमलला त्यातिल चंपक प्रीत दिली मी प्रीत मिळविण्या माझे रक्षक बनले कंटक रक्षक आता विश्व साजिरे गंधोदक शिंपाया भंजक

  • मानाचा श्रावण – MANACHA SHRAVAN (prestigious Shravan month)

    मानाचा श्रावण येणार बाई मानाचा श्रावण देणार बाई हेवेदावे मनातली ग कटुता मानाचा श्रावण नेणार बाई पाऊस नक्षत्रांसम मूळ रूप मानाचा श्रावण वेणार बाई अनुराधा मघा हस्त बाळलेणी मानाचा श्रावण लेणार बाई ओंजळी भरून मौक्तिक प्रीतीचे मानाचा श्रावण घेणार बाई गझल मात्रावृत्त (मात्रा १९)

  • दिव्यांची अवस – DIVYAANCHEE AVAS (new moon day of lamps)

    दिव्या-दिव्यांची अवस देखणी गुणानुरागी सरस देखणी सोमवती देवीस निघाली फेडायाला नवस देखणी बालक पालक आषाढाची कथा ऐकती सुरस देखणी शुद्ध भूवरी पाऊस धार जन्मा येण्या हवस देखणी रानामध्ये बांधावरती तरारली बघ जवस देखणी गझल मात्रावृत्त (मात्रा १६)

  • नामदेव – NAAMDEV (Name of marathi saint)

    क्षमाशील संसद व्हावी जसे नामदेव क्षमाशील साधू जैनी तसे नामदेव संयमास धारण करुनी जिंकले कषाय क्षमाशील धरणी यक्षी असे नामदेव ठाकठोक केली निष्ठुर मूर्त बसवण्यास क्षमाशील कायेमध्ये वसे नामदेव शिव्याशाप त्यांचे त्यांना पावुदेत लक्ष क्षमाशील ओठी माझ्या बसे नामदेव संत मूळ धर्मी पावन दिगंबर नामी क्षमाशील नेत्री माझ्या ठसे नामदेव गझल मात्रावृत्त (मात्रा २३)