Tag: Marathi sahitya

  • नेत्रांजन – NETRANJAN

    उंची खोली कळली नाही पण केंद्रातुन ढळली नाही विद्वत्तेचा आब राखण्या उथळपणे खळखळली नाही बरे समजुनी जे घडले ते व्यर्थ कधी हळहळली नाही हृदयामधली करुणा जपण्या डोळ्यांतुन घळघळली नाही संयम इतुका तनामनावर वादळात उन्मळली नाही काजळीचे नेत्रांजन केले अंतर्यामी मळली नाही खळाळणारा झरा “सुनेत्रा” आग विझवली जळली नाही

  • चौकशी – CHOUKASHI

    कशाला चौकशी आता तयांच्या कूट डावांची खुशीने मौन मी घेते कळाली जीत भावाची फुलांची गोष्ट मी लिहिता सुवासिक हात मम झाले फळाली निश्चयाने नय कथा व्यवहार नावाची घरांची अंगणे झाडून पोरी भिजविती माती जुनी ओळख जपाया सुगंधाच्या स्वभावाची जराही भ्यायले नव्हते तरीही गोठली गात्रे मला होती कळाली गुप्त भाषा त्या ठरावाची नदीकाठी पुराने घातला हैदोस…

  • मनमोर – MANMOR

    जाईल जीव ऐसे हसणे बरे नव्हे रडवून तेच रडणे बघणे बरे नव्हे रंगावरून आत्मा कैसा कळे खुणा कळतेच सर्व मजला म्हणणे बरे नव्हे मनमोर नाचणारा म्हणता नको नको तू त्यास जवळ ये ये वदणे बरे नव्हे उधळून रंग सारे श्रावण निघून गेला तो भादव्यात येता धरणे बरे नव्हे शेरात नाव लिहिण्या जागा कितीतरी मक्त्यातली सुनेत्रा…

  • नोटा नाणी – NOTA NANI

    झाले भावघन गोळा नाती सायीहून दाट लोण्यासाठी विरजल्या राती सायीहून दाट वावटळी चक्रीवात धूप कर्पूर गाभारी झाले बीज अंकुरीत माती सायीहून दाट बंध तोडायचे कसे जोडणारी मुळाक्षरे ओततात नोटा नाणी पाती सायीहून दाट धान्य सुपात ओताया पोती माय सोडते ही झाले गळे ओठ मौन जाती सायीहून दाट पंचभूते डोलताती ताल ठेका देह देतो कंठातून मुक्त…

  • मां – MAA

    जुन्या फायलींचे नवे बाड झाले तुझे मूळ कारण तुला कांड झाले तुला पावल्यावर बने बाहुली ती गगन चुंबण्याला जरी माड झाले तुझी लेक असुनी जणू लेक वाटे लढायास कुस्ती किती जाड झाले वसंतात भरले शिशीरात गळले उभी वाळल्यावर सुके हाड झाले धुके दाटल्यावर तुला ही दिसेना फुपाटा असोनी म्हणे राड झाले तुझे भुंकणे की नवी…

  • हिरवळ – HIRVAL

    देह मंदिरातिल आत्म्यावर हिरवळ मी तर सुकून जाण्या सर्वांगी फुलल्या काट्यांवर हिरवळ मी तर सुकून जाण्या दवात भिजल्या पहिल्या प्रहरी पहाटवाऱ्यासम तू येता टपटपणाऱ्या प्राजक्तावर हिरवळ मी तर सुकून जाण्या ग्रीष्माच्या काहिलीत वाळा घालुन भरता माठ जलाने वाळमिश्रित त्या उदकावर हिरवळ मी तर सुकून जाण्या सुगंध दशमीचे व्रत करुनी ऊद धूप जाळशिल जेंव्हा धुपारतीतिल उदाधुपावर…

  • मी पणा – MEE PANAA

    झाकुनी पाहिले ना बांधून पाहिले माठ घ्यावा तसे तुज ठोकून पाहिले वाचणे सोसते ना जीवास ते तसे फक्त व्यवहार जपण्या वाचून पाहिले जाणले निश्चयाने आत्म्यात मी पणा उकळुनी नीर बाकी गाळून पाहिले नाटके पाहिली मी पात्रात भूमिका घासुनी पात्र माझे विसळून पाहिले स्वच्छता आवडे अन धुडगूस सावळा पारवे अंगणी बघ पाळून पाहिले कैक पोती जुनेरी…