-
जादूची कांडी – JAADOOCHEE KAANDEE (magic wand)
गत आयुष्यातील आठवणी या नेहमीच सुखद असतात. याचे कारण घडून गेलेल्या त्या घटनांकडे आपण तटस्थपणे निरपेक्षपणे पहात असतो. त्या त्या काळात घडलेल्या अनुभवलेल्या आनंददायक घटना वर्तमानातील जगण्याचा आनंद वाढवतात. त्याकाळात ज्या घटना प्रसंगांमुळे आपण दुःखी झालो त्या घटना दुःख नेमके कशामुळे झाले होते याचे कारण शोधण्यास प्रवृत्त करतात. मग अशी कारणे शोधता शोधताच आपल्यातले काही…
-
गझलसदृश्य – GAZAL SADRUSHYA (some what like ghazal, but not in proper ghazal meter)
जर्द रवीला जाळ म्हणूया भडक फुलांची दुशाल म्हणुया करे प्रदर्शन दानाचे जी तिजला बोली सवाल म्हणुया स्वच्छ मनाचे मुलगे जे जे त्या मुलग्यांना बाल म्हणूया पक्षपात जो कधी न करतो त्याला सुंदर काल म्हणूया कटकट मोडे त्या काष्ठाला मस्त भिजोनी वाळ म्हणूया जीव जीवाला जीवच म्हणतो पुदगलास पण माल म्हणूया सिंहकटीसम कमर जिची तिज चाळ…
-
गालगाल – GAAL GAAL
-
तगडा – TAGADAA(strong)
पाठीमागे कर्तव्याचा लकडा होता पगडीवरती परंपरेचा पगडा होता स्वप्ने होती नेत्रांमध्ये स्वातंत्र्याची कवी मनाचा तरी तवाना लुकडा होता विमान नव्हते बाइक नव्हती सायकलसुद्धा वाहन त्याचे दो चाकांचा छकडा होता उजळ भाल ते उंच नासिका हाती सोटा असा चेहरा भाव त्यावरी करडा होता जमीन होती कसावयाला हृदयी श्रद्धा तब्येतीने धडधाकट अन तगडा होता
-
जलदमाला – JALAD MAALAA (An array of water clouds)
फुला-पाखरांचे थवे गात आले मनाचे गुलाबी गडद पान झाले पुन्हा झिंग येण्या तशी जांभळी ती हळदुली उन्हाने भरूयात प्याले पुरा-वादळाच्या तडाख्यात काळ्या लव्हाळीपरी तृण झुकूदेत भाले झरा पीतवर्णी प्रभाती झळाळे दिशांचे फिकुटले वसन हे उडाले मृदुल पाकळ्यांवर दवाचा फुलोरा जसे कर्पुरांचे निळे दीप झाले दुपट्ट्यात हिरव्या हसे मुग्ध चाफा सुगंधात ओल्या मयुर चिंब न्हाले थिटी…
-
पूर्ण भरावे – PURN BHARAAVE (“to fill out completely”)
-
सत प्रेमांकुर – SAT PREMAANKUR (“the shoot of divine love”)
किती किती मी आहे सुंदर माझ्यासाठी गाते अंबर माझा अभिनय माझी काया हृदयी रुजवी सत प्रेमांकुर जीवांच्या कल्याणासाठी वेड्यासम हा माझा संगर क्षमा करा मज प्रिय बंधूंनो तुमच्यासाठी फोडिन कंकर तुमची पूजा हृदयापासुन नका ढळू चालीने मंथर मुग्ध फुलांचे भाव निरागस टिपते हे रुणझुणते झुंबर काळिज माझे सदा दक्ष हे जिनानुयांचे जपण्या अंतर प्रेमच मम…