Tag: Marathi sahitya

  • आवडे – (is fond of)

    मज मना लाजणे आवडे पापण्या झुकविणे आवडे राग तो गिळुनिया अंतरी अधर तव दाबणे आवडे कावरी बावरी लोचने चोरुनी वाचणे आवडे हृदय तू बंद केले जरी त्यात मज राहणे आवडे मी समोरी असोनी तुझ्या आडुनी पाहणे आवडे टोमणे मारणे बासना मज मधुर बोलणे आवडे दे सुनेत्रा गझल नित नवी त्यात मज डुंबणे आवडे वृत्त –…

  • रे मना – RE MANAA ((“oh my mind”)

    आज तू बोलना रे मना मौन तू त्यागना रे मना सावल्या सोडुनी चालल्या भटकणे सोडना रे मना पांगली माणसे जवळची ती पुन्हा जोडना रे मना गोडवा चाखण्या प्रीतिचा विकृती जाळना रे मना रडविले तू मला कैकदा मजसवे हासना रे मना मैत्र हे अंतरी टिकविण्या मोकळे होचना रे मना गा पुन्हा गीत तू ते जुने भिजवुनी…

  • पद्मावति – PADMAAVATI (goddess)

    लिहित रहा तू गात रहा तू कुणी न गझला तुझ्या विके घडीभराचा, घेच विसावा, पुढे दाटले, गच्च धुके हळूहळू अरुणोदय होइल, शांत झोपल्या, धरेवरी दिशा स्वतःही, निघे पूजना, वस्त्र तिचे मृदु, धूत फिके स्वच्छ झाडल्या, पदपथावरी, प्राजक्ताचा, सडा पडे भल्या पहाटे, वेचत पुष्पे, कोणी बालक, गणित शिके पालखीत वनदेवी बसता, चवऱ्या ढाळी, रानजुई स्वागत करण्या,…

  • सोन्याचा शिंपला – SONYAACHAA SHIMPALAA (golden mussel)

    एक तुला मी दिला शिंपला सोन्याचा शिंपला दवबिंदूंना झेलायाला सोन्याचा शिंपला दोन शिंपले मिळून बनते हृदय आपुले जरी उघड शिंपला अलगद वरचा हो पंखांची परी दोन शिंपले दोन दलांसम घे तू पाठीवरी होउन खग मग घेच भरारी निळ्या घनांच्यावरी हृदयामधल्या दवबिंदूचे मोती उधळित जा पडतील मोती जेथे जेथे अमृत शिंपित जा येतील वरती मातीमधुनी मोत्यांची…

  • नवनवोन्मेष शालिनी – NAV NAVONMESSHA SHAALINEE((“possessing the faculty of ever-fresh invention or constant creative intution”)

    नवनवोन्मेष शालिनी मम प्रतिभा वरदायिनी ।धृपद। नऊ रसांचे पान करोनी नव रंगांची उधळण करुनी तृप्त हसे शरदिनी ।१। मधुघट भरले पावित्र्याने सतार दिडदा गाते गाणे मयुर नाचतो वनी ।२। शेवंती अन झेंडू माला आम्रपर्णयुत तोरण दारा रांगोळी अंगणी ।३। अम्बरातले चंद्र चांदणे बिंब जलातिल लोभसवाणे शुभ्र किरण कुमुदिनी ।४। निळे सरोवर भरून वाहे हंस हंसिनी…

  • पर्व पर्युषण – PARVA PARYUSHAN (jain festival)

    भाद्रपदातिल शुक्ल पंचमीस पर्व पर्युषण येते खास तिथिस या नेमाने मग प्रियची आठवण येते प्रिय म्हणजे जो हृदयी वसतो व्यर्थ न भटकत बसतो धर्म अहिंसा स्थापित करण्या मनामधे अवतरतो देवघराचा मोह न प्रियला प्रियवर मोहित सैनी पुण्यभूवरी प्रियसाठी नव मंदिर बांधे जैनी क्षमा मार्दवे जीव शोभतो आर्जव सुवर्ण कंकण देह शुद्ध अन हृदयी शुचिता हे…

  • दशलक्षण पर्व – DASH LAKSHAN PARV (Jain festival in Bhadrapad month)

    दिगंबर जैनांचे पर्युषण पर्व भाद्रपद शुद्ध पंचमी पासून चालू होते. दिगंबर जैनांच्या पर्युषण पर्वामधला (दशलक्षण पर्व ) पहिला दिवस क्षमा धर्माचा असतो. येथे उत्तम क्षमा धर्माचे पालन दिगंबर मुनिराज करतात. गृहस्थांनी व गृहिणींनी या दिवशी भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन शुद्ध मनाने दिगंबर जैन मंदिरात दर्शनासाठी जायचे असते. सोबत मुलाबाळांना नेता आले तर उत्तमच! दिगंबर मंदिरातील…