Tag: Marathi sahitya

  • संक्रांति बाई – SANKRAANTI BAAEE

    आली आली संक्रांति बाई.. जणू मोहक जाई जुई… कंकणे वस्त्र तांबडे लाल हातात धरला सुगंधी बेल रथात बैसली मांडीवर मूल सारथी शेजारी हाई चंपक जाई जुई.. रागिणी संक्रांति बाई… भाळावर गोल टिळा लावुनी जात नारीची जनां सांगुनी तृप्त होतसे क्षीर पिऊनी कुंभ धारिणी ताई मोगरा जाई जुई.. मानिनी संक्रांति बाई… नक्षत्र हाय मोहोदरी वायव्य दिशेला…

  • कागुद चिंधी झाला – (KAGUD CHINDHI ZALA (the paper was shredded inti pieces)

    मी इळभर लिवले शिवले पर कागुद चिंधी झाला ती उनाड मैना कावुन शबुदाचा करती काला त्यो पान खाउनी थुकला मी हुशार हाये म्हणला मंग मीबी बोल्ले लिवरं त्यो चघळत बसला पाला म्या कायबाय गिरगटलय त्ये चिडलं तरिबी हासतय खट दाजी सरकिट येडा पन खासा दिसतुय साला गझलच्या जिमीनीमंदी मिरचीचा वाफा सजला ये तोडू लवंगि मिरची…

  • असे झाले – ASE ZAALE (“It happened like this”)

    लालका गाल हे असे झाले चुंबिता भाल हे असे झाले सूर ना लागला लय खरी पण सोडता ताल हे असे झाले कारवां चालला दुज्या गावा उठविता पाल हे असे झाले स्पर्शिता थरथरे किती काया आज ना काल हे असे झाले तिजसवे झिंगले खरे वेडे पाहुनी चाल हे असे झाले वृत्त -लज्जिता, मात्रा -१७ लगावली –…

  • भुई नाचे – BHUEE NAACHE (land dances)

    सावळी सावळी भुई नाचे त्यावरी वल्लरी जुई नाचे पाच बोटांवरी बसोनीया सान कैरीतली कुई नाचे वस्त्र आहे जरी भरड त्यावर होत मागे पुढे सुई नाचे मेघना दामिनी कडाडे अन मस्त तो मोर थुइ थुई नाचे वारियाने उडे झुले धावे स्वैर ती रानची रुई नाचे वृत्त -लज्जिता, मात्रा -१७ लगावली – गा ल गा/गा ल गा/ल…

  • धरण – DHARAN (dam)

    पूर्ण भरता धरण आसवांचे ऊन्ह करते हरण वासनांचे अंबरी विहरता मेघमाला रान वाटे जणू मोतियांचे चुंबिता वात तो घन घनांना वीज माळे तुरे तारकांचे शीत धारांसवे धावताती जलद हे भूवरी भावनांचे तृप्त होता धरा जीवसृष्टी पीक येई नवे चांदण्यांचे वृत्त – भामिनी लगावली – गा ल गा/गा ल गा/ गा ल गा गा

  • आस आहे – ( have a desire)

    बोलती कावळे आस आहे कोणती नाकळे आस आहे काक ना स्पर्शिती पिंड जेव्हा सांगती बावळे आस आहे पाहती चोरुनी जे नको ते ते जरी सोवळे आस आहे मंदिरी अंतरी ज्योत तेवे भिंत का काजळे आस आहे आवळे वाटुनी चोरलेले लाटती कोहळे आस आहे वृत्त – भामिनी लगावली – गा ल गा/गा ल गा/ गा ल…

  • कोन – cone shaped tube

    सांग गझला कशाने लिहू मी हात मिटला कशाने लिहू मी धारना राहिली लेखणीला टाक पिचला कशाने लिहू मी प्राशुनी नीर सारे नदीचे पेन फुटला कशाने लिहू मी पेलता दो करी जड धनूला बाण सुटला कशाने लिहू मी नाव मेंदीतले रेख म्हणशी कोन तुटला कशाने लिहू मी वृत्त – भामिनी लगावली – गा ल गा/गा ल…