-
स्वहित – SWAHIT
स्वहित … स्वहित साधुनी पुनीत झाले अंतर माझे परहित करते सहज सहज मन अंबर माझे सत्य शोधण्या मार्ग अहिंसक स्वीकारोनी स्वतःस करण्या सिद्ध कैक हे संगर माझे ओळ … उषःकाल हा सुरभित ओला पाऊस धारा मनात ओळ चाफा पिवळा भिजत धरेवर टपटपलेला म्हणतो बोल सुंदर किती सुंदर… आयुष्याचं पान असतं जणू कागदाचं पान असतं !…
-
टेच – TECH
म्हणतात खेच बाही टळण्या बळेच काही माझेच मज मिळाले फुकटात टेच नाही पाऊस हा असाकी फुटले घडेच दाही बदलव स्वतः स्वतःला पंचांग पेच वाही प्रत्येक दिस निराळा घडते न तेच माही होईल तव अहंची लागून ठेच लाही गझलेतुनी बरसतो तो मोद वेच राही
-
हैदोस – HAIDOS
वादळाने घातला हैदोस कारण जांभळांचे पक्व झाले घोस कारण का असा पाऊस वाऱ्या कावलेला कावण्याचे दे मला तू ठोस कारण हे असे मौनात जाती मेघ अवचित मूग गिळण्याचा मिळाला डोस कारण का बरे ते टाळताती बोलण्याला इभ्रतीचा जीवघेणा सोस कारण ही अशी फुगलीत नगरे माणसांनी जाहल्या वस्त्या नि वाड्या ओस कारण कापले तू अंतराला फक्त…
-
लोड – LOD (LOAD)
चाळणे मातीस आता सोड दोस्ता माय माती लाल काळी गोड दोस्ता रंगरूपाचीच चर्चा बोर करते तू मनाला आत्मियाशी जोड दोस्ता तोच डोंगर घाट सोपा जाहल्यावर घेच आता वेगळा तू मोड दोस्ता बांधुनी पद्यात तत्वे टेस्ट केली घे लिहाया गुणगुणुनी कोड दोस्ता शेवटाचा शेर येता नाव माझे गुंफण्याची सवय आता छोड दोस्ता आवडे मज नाव माझे…
-
मध्यरात्री – MADHYARAATREE
आयुष्य तेच नाही हे ही खरेच आहे आहे तसेच काही हे ही खरेच आहे पंख्यास एक पाते कुरकूर ना तरीही वारा बळेच वाही हे ही खरेच आहे आवळु नको खिळ्याला ठोकून बसव त्याला त्याच्यात पेच नाही हे ही खरेच आहे अवसेस मध्यरात्री मजला धरा म्हणाली अंधार वेच राही हे ही खरेच आहे हातात येत नाही…
-
जिवलग – JIVALAG
व्यक्त कराया भावभावना गझल लिहावी काफियातल्या अलामतीला जपत लिहावी दोस्ता जैसा रदीफ जिवलग शान वाढवी गझल कुणीही मनात गुणगुण करत लिहावी
-
त्रस्त – TRAST
तरही गझल गझलेची पहिली ओळ कवी बिनधास्त बालाजी मुंडे यांची मतला माझा कुणा कधी ना पटतो दोस्ता मतला माझा माझ्यासाठी असतो दोस्ता आवडलेल्या ओळीवरती तरही लिहिते तुझा त्यातुनी विचार मजला कळतो दोस्ता असे लिहावे तसे लिहावे डोस प्राशुनी कधी न आत्मा त्रस्त तरीही विटतो दोस्ता शब्दांवर का असे कुणाची सांग मालकी नवोदितांना शब्दचोर तो म्हणतो…