घटाटोप – GHATATOP


घटाटोप …
आभाळाच्या शिरी शोभतो घटाटोप जलदांचा
पाऊस पाडाया धरणीवर खटाटोप जलदांचा
डोंगरमाथ्यांवरती धोधो कोसळती जलधारा
सत्य शिवाच्या सुंदरतेवर जटाटोप जलदांचा

कृष्णमेघ…
धरतीवर जणु कलश घड्यांचे कृष्णमेघ झरती
भरुन वाहती जोहड धरणे कृष्णमेघ झरती
चिंब जाहली भिजुन मृत्तिका निर्झर खळखळतो
मधुर तराणे कृतज्ञतेचे कृष्णमेघ झरतो

रुमाल…
ज्येष्ठामधल्या नक्षत्रांची कमाल जादूई
लक्ष लक्ष घन गर्द ढगांचा रुमाल जादूई
कोटी कोटी एकर जमिनींवर रिमझीम पाऊस
स्वच्छ शुद्ध गाळीव नीर धन धमाल जादूई


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.