-
सगुण – SAGUN
सगुण असो वा निर्गुण तो रे प्रीत तयावर जडली माझी … जळी स्थळी काष्ठी पाषाणी मीच मूर्त त्यातून घडवली … वात्सल्याचा भाव भरोनी निर्गुण प्रतिमा सगुण जाहली … तीन रत्नयुत ज्योत दिव्याची अंतर्यामी एक उजळली …
-
बनेन दाता – BANEN DATA
उत्तम शुचिता धर्म ओळखुन नमू जिनाला मर्म ओळखुन पर्युषण हे पर्वच प्रिय मज बनेन दाता कर्म ओळखुन
-
शीळ – SHEEL
श्रावणातलया नीळ घनातिल रिमझिम जल बरसे सहज सुटोनी पीळ मनातिल रिमझिम जल बरसे मोरपिसारा फुलवुन नाचे मयुर गवतावरी पडता कानी शीळ बनातिल रिमझिम जल बरसे
-
स्वप्न देखणे – SWAPN DEKHANE
सौधावरती उभे राहुनी पहात राहू स्वप्न देखणे झाडावरती महाल अपुला निवांत गाऊ गीत साजणे हवेत उडते विमान सुंदर खरी कराया सजग कहाणी हात असूदे हातामध्ये नको गोठणे नको तापणे
-
किरण मंजिरी – KIRAN MANJIREE
जाळीतुन पानांच्या उमले किरण मंजिरी सळसळणारी रविकर कुलकर करिता करणी झुळुक गुंजते झुळझुळणारी सुनेत्र उघडी भास्कर दोन्ही मिटते डोळे लज्जित अवनी नयनांमधुनी सुरेख वर्षे मुक्त निर्झरा खळखळणारी
-
धनादेश – DHANAADESH
धनादेश मी दशकोटीचा कटले नाही उठवुन ठेंगा अंधपणाने वटले नाही काचपात्र मी शुद्ध जलाचे सुबक ठेंगणे पितळी कळशीच्या धक्क्याने फुटले नाही मात्रावृत्त (८+८+८=२४मात्रा)
-
विद्युल्लता – VIDYULLATAA
नेत्र मिटता राधिकेचे श्याम बघण्या अंतरी मेघ झुकती अंबरीचे वर्षण्या मातीवरी पकडण्या वाऱ्यास वेड्या नाचुनी विद्युल्लता हात धरता वारियाचा कोसळे धरणीवरी वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.