Tag: Muktak

  • बंड – BAND

    वनराईची नित्य नवी आरास तुझ्यासाठी झरे वल्लरी घेतिल आता श्वास तुझ्यासाठी अधरांचे हे बंड असावे संयम खरा खरा पानांवर बघ दवबिंदुंची रास तुझ्यासाठी मात्रावृत्त(८+८+१०=२६ मात्रा)

  • मौक्तिक – MOUKTIK

    गुलबक्षीचा, रंग ल्यायल्या, गालांवरती, मीनाकृतिसम, नयनांमधले, अश्रू भरले, टपोर मोती, उधळुन देऊ, मुक्त मनाने! नेणीवेतिल, विस्मरणातिल, वा स्मरणातिल, कर्मफळांतिल, कठिण कवचयुत, कटू बियांची, भरून पोती, उधळुन देऊ, मुक्त मनाने! हिरे माणके, पुष्कराज अन, मौक्तिक पाचू, याहुन तेजोमय रत्नत्रय, अंतर्यामी, ज्या रत्नांच्या, त्या रत्नांच्या, वेलीवरची; दवबिंदूसम, निर्मळ दुर्मिळ, खुडून पुष्पे, पानापानावर हृदयाच्या, काव्यामधुनी, जपली होती, उधळुन…

  • प्रिया सावळी – PRIYAA SAAVALEE

    स्वमग्न नाही आत्ममग्न मी काव्यामध्ये स्वात्ममग्न मी प्रिया सावळी सुंदर शुभ्रा कधी कधी परमात्ममग्न मी

  • अहिंसा – AHINSAA

    सदैव असुदे मनात माझ्या प्रीत अहिंसा खरी अनेकांतमय सत्यासाठी जीत अहिंसा खरी सम्यग्दर्शन ज्ञान मिळविण्या जीव साधना करी चारित्र्याच्या घडणीसाठी रीत अहिंसा खरी मुक्तक- मात्रा सत्तावीस=(आठ+आठ+आठ+तीन), २७=८+८+८+३

  • पहाट गाणे – PAHAAT GAANE

    भाळावरी नभाच्या, पूर्वेस चंद्रकोर; जाळीतुनी ढगांच्या, हसते सकाळ भोर. गाई भारद्वाज, त्याचे पहाट गाणे; फुलली प्रभात हसरी, नाचे मनात मोर.. चारोळी-मात्रा,तेवीस(२३)

  • कळस वाटते आहे – KALAS VATATE AAHE

    This muktak or chaarolee is writeen in twenty-four maatraas. Here radif is Vatate aahe(वाटते आहे) and kaafiyaas are kilas, palas, kalas. कोणास भावनेची किळस वाटते आहे कोणास वासना ही पळस वाटते आहे पाण्याविना धरेचे देऊळ तापलेले त्यावर उपडी घागर कळस वाटते आहे

  • धन्य हे – DHANYA HE

    In this poem, which is basically a ‘muktak’ in the form of ‘charoli’, the poetess explains us the importance of true ‘Guru’ in our life. धन्य हे सारे गुरू साधे पूज्य ते कृष्णासही राधे रम्य बघ जोडेल प्रेमाला सख्यची बाधा खुळी बाधे