Tag: Muktak

  • रोज लिहावे (तीन मुक्तके) – ROJ LIHAVE (“SHOULD WRITE DAILY”)

    प्रभातीस मी लिहिते काही प्रभातीस आठवते काही किलबिल ऐकत पक्ष्यांची मज प्रभातीस जागवते काही …. लिहिण्यासाठी सहज सुचावे स्वप्न मराठी तुझे तुझे हसावे व्यक्त कराया भाव मोकळे भाषेचे ना बंधन व्हावे …. रोज लिहावे असेच काही अक्षरांतुनी हसेल काही लिहिता लिहिता झरती डोळे देणे त्यातुन जमेल काही ….

  • मंगल(मङ्गल) – MANGAL (AUSPICIOUS)

    मंगल मन्गल मङ्गल चरणी शुद्ध निरञ्जन दीप तेवतो मुनी दिगंबर निर्भय ज्ञानी जितेंद्रिय आत्म्यात राहतो अभय मिळाया जीवांना हा काळ खरा पावन आला हो पानगळीचा ऋतू शिशिर हा मुक्तक लिहिण्या मला भावतो मुक्तक – मात्रावृत्त (३२ मात्रा)

  • भविष्य माझे – BHAVISHYA MAAZE (MY FUTURE)

    भविष्य माझे मीच सांगुनी मी घडवावे भविष्य माझे मला न भीती कशाकशाची मीच लिहावे भविष्य माझे भूतकाळ मम् सुंदर होता वर्तमानही सुंदर सुंदर भविष्य सुद्धा अतीव सुंदर ऐसे गावे भविष्य माझे मुक्तक – मात्रावृत्त (८/८/८/८/) ३२ मात्रा

  • आरसपाणी – AARAS-PAANEE (TRANSPERANT)

    जलद प्रकटले बिजलीसंगे मौन योगिनी सृष्टी झाली जलद जलद घन मुक्त बरसले तप्त धरेवर वृष्टी झाली जलद कृष्ण बन गडद स्मृतींचे हळू उतरले पापणकाठी जलद “सुनेत्रा” झरझर झरले आरसपाणी दृष्टी झाली

  • जादुमयी – JAADUMAYEE ( magical)

    कलाकार सृष्टी जादुमयी कलाकार वृष्टी जादुमयी मला लाभुदे रत्नत्रययुत कलाकार दृष्टी जादुमयी गूढ धीर तिसऱ्या शेरातिल कलाकार तृष्टी जादुमयी तीन शेरांचे मुक्तक (मात्रा १६)

  • जिनबिंब – JINBIMB (image of lord jina)

    अकिंचन्य धर्माच्या दिवशी झळाळले जिनबिंब अंतरी जळात विहिरीमधल्या हलतो भावुक होउन लिंब अंतरी सान प्रतिक हे अपरिग्रहाचे हवी तेवढी त्रिज्या घेउन भवती अपुल्या भूमी मापे केंद्रक बनुनी टिंब अंतरी काळ्या मेघी पाहुन डोळे नितळ साजिरे मायपित्याचे सर कोसळली सरसर सरसर झाली सृष्टी चिंब अंतरी मुक्तक तीन शेरांचे… मात्रावृत्त (मात्रा ३२)

  • भगवती – BHAGAVATEE (possessing fortune majesty)

    घनतमी किती या संहार जाहला जरी प्रतिबिंब जळी मी पाहिले दिव्याचे परी मन खरे मला हे सांगून सांगून बघे भगवती उषेला मंत्रात बांधुनी घरी झरणार शब्द घन दाटून येता हृदये श्रावणी धनाची लयलूट करूया हरी मुक्तक(तीन शेरांचे,मात्रा २३)