Tag: Muktak

  • पार लेखणी – PAAR LEKHANEE

    लेखणी शमा रमा कमल कुसुम ठाकले शेर चंद्रमा निशा दार जाम लागले मुक्तकात भूप तो राग गातसे कुणी साथ देश ईश्वरी पार होत हासले

  • अलक रुबाई – ALAK RUBAI

    घरी वावरे रस्त्यावरची वर्दळ जेंव्हा मुकीमुकी परसामध्ये राबत बसते मर्गळ तेंव्हा मुकीमुकी कोरांटीचे कुंपण हिरवे नाजुकसाजुक सान कळ्या आठवते मज सावलीतली कर्दळ केंव्हा मुकीमुकी … गडद निळाई वाकुन बघते हौदामधल्या जळी पेंगुळलेली रातराणी गोकर्णीसम निळी अश्या अवेळी निळ्या घनातुन बरसे जेंव्हा धार जळात उठती थेंबांभवती वलये गोलाकार … अती लघुत्तम कथेस म्हणती अलक बरे अश्या…

  • विळीसमान – VILEESAMAAN

    मोर नाचतो नाच नाचतो भूमीवरती राजहंस पण जळी विहरतो भूमीवरती राजहंस वा मोर असूदे जीवच दोघे सुंदरतेला जीव जाणतो भूमीवरती … वक्रपणा मम विळीसमान वेलांटीच्या कळीसमान सुमान माझा शब्द भरीचा कुसुमांकित दळ खळीसमान … फक्त वासना फुलवित जाते जिथे फुलोरा हवा कशाला असा दिखाऊ प्रथे फुलोरा मूर्त असावी घरी अंतरी वा गाभारी अहंपणाचा नको त्यावरी…

  • सुंदरता – SUNDARTAA

    मोर नाचतो नाचनाचतो भूमीवरती राजहंस पण जळी विहरतो भूमीवरती राजहंस वा मोर असूदे जीवच दोघे सुंदरतेला जीव जाणतो भूमीवरती

  • गडे – GADE

    कप अन बशीला सांग गडे कारण पिशी का भांग गडे शब्दच अडूनी मूक बसे काव्य न कधी विकलांग गडे लगावली – गागा/लगागा/गाललगा/

  • गरे वाटण्या – GARE VAATANYAA

    विसरुन जा ते असे कुणाला म्हटले तरिही आयुष्याशी बोलू द्यावे .. बरे वाटण्या फणस खोबरी वर काटेरी सोलायाला मदत विळ्याला करण्यासाठी .. गरे वाटण्या बरे वाटता गरे वाटता झरे वाहती हृदयामधले ऊर मोकळा .. होतो नकळत अंतरातुनी उमलुन येतो अभिनय उपजत खऱ्यांपुढे पण खरे वागणे .. खरे वाटण्या

  • काईट्स – KITES

    ओल्डन हाईटस गोल्डन बाईटस दे वेअर फ्लाईंग सोल्डन काईट्स