-
बघ रुबाई – BAGH RUBAAEE
एक ताजी बघ रुबाई .. पसरण्या पाया भटाला ना दिली मी ओसरी बघ.. स्नानघर करण्या न दिधली कोरडी मी ओसरी बघ ….. शेटजीची बाल्कनी वा गॅलरी नव सौध शाही .. टोक माझे राजवाडी बुरुज टेहळणीस राही …..
-
पीकुसो – PEEKUSO
पीत बहावा !! खडा दुपारी !! ग्रीष्मासंगे !!! डोंगर माथी अथवा दारी !! ग्रीष्मासंगे !!!! आई दादा ! फुलांत हसण्या !! पिवळ्या हळदी !!! शिंपावी जलदांनी झारी !!! ग्रीष्मासंगे !!!! ….. कुल मार्जारी ! मस्त कलंदर !! मस्त कलंदर !!! भाव बोलती ! किती बिलंदर !! मस्त कलंदर !!! चित्र बोलते ! रेषा ओढत !!…
-
आलेख – ALEKH
चपला … पत्रामधले भाव अक्षरी जांभुळलेले मेघ जणु जलद गतीने झरे लेखणी चपला घेते वेग जणु मुसळधार पाऊस कोसळे घनमालेतुन परसात परिमल भिजल्या बकुळ तळीचा दूर पोचला शहरात कांदा … पाऊस उभा थरथरतो कोसळताना होत जांभळा सळसळतो कोसळताना कापता वीज कांद्यासम उलगडताना पापण्यांतुनी झरझरतो कोसळताना पेग… लाटांतुन उसळे भरतीचा आवेग अंबरी झळकतो बिजलीचाआलेख चल घेऊ…
-
दीपक – DIPAK
थांबते ना टोचता पायी सराटा बैलजोडीनेतसे गाडी पुढे धुंडून वाटा बैलजोडीश्वेत आणी पीत संगे पद्म लेश्या..चक्र दीपकनील कापोती न आता कृष्ण लेश्या .. चक्र दीपक
-
फूड – FOOD
चवदावे रत्न …. सुबक ठेंगणी वय चवदाची गझल देखणी सय चवदाची रत्न रुबाई हे चवदावे बाईपण मम मजला भावे … बटुव्याची खीर…. मी कणिक तिंबुनी गोळा केला बाई … अन हात चोळले हातावरती बाई… पाऊस बरसता बटुव्यांचा झरझरा … कढईत बटुवे भरले मग भरभरा … ठेवुनी चुलीवर केली विचारपूस … साजूक तुपावर परतून ते खरपूस…
-
जंबुद्वीप – JAMBU DVEEP
जंबुद्वीपामध्ये अपुली भारत भूमी आहे जंबुद्वीपी खंड देश अन वसली कितीक राष्ट्रे गुलजार भारताच्या भूमीवर जगावे जीवास जीव द्यावा हे मागणे असावे.. … असे असावे जगणे आणिक अशी असावी माया लष्करातली सक्त शिस्त अन हा पोलीसी खाक्या हा खाक्या की दहशत आहे कसे कळावे कोणा नसेल सखये दहशत बिहशत हा प्रीतीचा बाणा
-
चुकते अपुले – CHUKATE APULE
चुकते अपुले… शिकवण्या जादुई काही बघ वेळ अजुनही …गेली नाही काही जो विरह सुगंधी … करून तुजला गेला तव हाक ऐकुनी … वाटेवर बघ अडला … भरता भरता बुडते घागर ,,,भरून वरती येते तरंगते पाण्यावर हलके … तरून वरती येते निवांत जीवनगाणे आता… गाण्यासाठी जगते एक एक क्षण जगून घयावा … जगण्यासाठी तरते … कागदी…