-
जैन गझल – JAIN GAZAL
जितुकी सोपी तितुकी अवघड आहे माझी जैन गझल हिमशिखरावर जाऊन बसली सदैव ताजी जैन गझल आहे हट्टी अवखळ पागल पिसे तिला मम वेडाचे वेडासाठी प्राण त्यागण्या होते राजी जैन गझल साधक श्रावक जैन अजैनी पंडित मुल्ला गुरवांच्या नकळत हृदयी थेट शिरोनी मारे बाजी जैन गझल मिष्टान्नावर ताव मारण्या बसता सारे मधुमेही त्यांना वाढे जांभुळ अन…
-
मानी – MAANEE
म्हणशिल तू जर लिहिन कहाणी कारण मीही आहे मानी येशिल जेव्हा उकलुन गाठी देइन तुजला साखरपाणी वैशाखाने आज शिंपली सुगंधजलयुत गुलाबदाणी मृद्गंधाची धूळ टिपाया हृदयी माझ्या अत्तरदाणी मौन प्राशुनी तृप्त जाहली फुलली हसली खुलली वाणी मृदुल कोवळ्या शशिकिरणांची माधुर्याने भिजली वाणी मनात शुद्धी खरी असूदे दिवानी वा लिही दिवाणी प्रेमासाठी मत्सर प्याले वेडी म्हण वा…
-
पंक कशाला – PANKA KASHAALAA
साद घालण्या शंख कशाला मनात धरण्या अंक कशाला स्पर्श कराया निळ्या नभाला चुंब फुलांना डंख कशाला रांध चुलीवर अन्न चवीचे फूड हवे तुज जंक कशाला लवचिक होण्या ताठ अंगुली गिरव अक्षरे टंक कशाला संपव कामे मग सुट्टी घे उगाच दांडी बंक कशाला पुण्य कमवुनी रावच व्हावे फुका व्हायचे रंक कशाला बनेन कोकिळ मधुर गावया नाटक…
-
गगन जाहले निळे – GAGAN JAAHALE NILE
कण्हेरमाळा गळा घालुनी मूर्त गोजिरी खुले गुलबक्षीसम अंग रंगवुन सांजसमय सळसळे कृष्णकमळ कातळी उमलता जळी चंद्रमा हले गुलाब पिवळा करी सईच्या बोटांमध्ये वळे प्राजक्ताला धरून अधरी झरझर पळती पळे बकुल फुलांचा सुगंध भरुनी धूप मंदिरी जळे झेंडूचे बन सुवर्णवर्खी वाऱ्यावरती डुले चाफा हिरवा सुगंध वाटित पानांतुन हुळहुळे जास्वंदीची कर्णभूषणे घालुन सजली फुले डेलीयाच्या रंगोलीवर शेवंतीची…
-
खरे नबाबी – KHARE NABAABEE
नको निळे अन, नको गुलाबी, पत्र धाड रे खरे नबाबी लिहुन मायना, वहिनी भाभी, पत्र धाड रे खरे नबाबी रंग रुपाची, सुमार चर्चा, हेवेदावे, तू तू मी मी वगळुन असल्या, क्षुल्लक बाबी, पत्र धाड रे खरे नबाबी रंगबिरंगी, फूल सुरंगी, सुकले अथवा, असो कागदी सुगंध घोळुन, त्यात शबाबी, पत्र धाड रे खरे नबाबी नको प्रिय…
-
सारथी – SAARATHEE
वादळे रोंरावताना मेघ गगनी ठाकती शेर ओढी रथ ढगांचा ‘मी’ तयांचा सारथी खेचुनी मम भाव सारे शून्य मी भासे कधी छळत राही पण अनामिक सांजवेळी ओढ ती पौर्णिमेचा चंद्र उगवे अंतरी माझ्या कधी द्यावया आतूर हाका घन समुद्री गाज ती वादळे बनतात जेंव्हा भावनांची गलबते मीच प्रज्ञा मीच प्रतिभा मी सुमेधा अन रथी बीज असुदे…
-
‘मी’पण ‘तू’पण – ‘MEE’PAN ‘TOO’PAN
मीपण तूपण, उकळत गेले, मी तू मी तू, म्हणता म्हणता… अधरांवरती, गरळ साठले, छी थू छी थू, म्हणता म्हणता… अर्क सुगंधी, कडवट कोको, चहा पातिचा, दुधाळ कॉफी पेय कपातिल, उडून गेले, पी तू पी तू, म्हणता म्हणता… प्रेम प्रियेचे, कधिन जाणले, फक्त बोचरे शब्द ऐकले हयात सारी, संपुन गेली, ती तू ती तू म्हणता म्हणता……