This Ghazal is written in Akasharganvrutta. The vrutta used is LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA. In this Ghazal the poetess says, Woman have to perform the role of mother, friend, daughter and home manager together with dear wife, after marriage
तुझ्या वेदनांच्या फुलांना खुडावे
असे वाटते की तुझी माय व्हावे
सखी मी प्रिया मी असे मीच कन्या
तुझे बाल्य जपण्या तुला कुरवळावे
जरी टोचले रे तुला कंटकांनी
तरी गंध देशी कसे मी रडावे
नको पावती रे मला जाळते ती
तुझ्या शुभ्र हृदयी हळू मी वसावे
अता या जगाने तुला ओळखावे
तुला प्रेम द्यावे तुझे प्रेम घ्यावे
असा शिकविला तू सुनेत्रास मक्ता
तिने लेखणीने जगा हासवावे
वृत्त- ल गा गा, ल गा गा, ल गा गा, ल गा गा.