पराधीन होतो प्राणी कर्मबद्ध होतो
कर्म रोखुनी जाळूनी तोच सिद्ध होतो
सहज मैत्र जुळते जेव्हाअहं गळुन जाई
द्वैत संपुनीया जाता भाव शुद्ध होतो
पाच पांडवांची पत्नी एक द्रौपदी हो
सत्यकथा याला म्हणता धर्म क्रुद्ध होतो
आत्महिता जपण्यासाठी जीव दक्ष सैनी
परहित पण करता तपता बंध वृद्ध होतो
पंथवाद प्रिय भोग्यांना जाण मानवा तू
मनुज क्षुद्र मोही फसुनी अंधश्रद्ध होतो
गझल मात्रावृत्त (१४/१०)२४ मात्रा