विचार अमुचा आहे पक्का म्हणते अंनिस
उठेल पेटुन मानव सच्चा म्हणते अंनिस
नकोत शस्त्रे जिंकू युद्धे बाहुबलाने
अभय व्हावया बालक बच्चा म्हणते अंनिस
बंधुत्वाची ज्योत तेवण्या दृष्टी देण्या
दादा भैय्या भाऊ अण्णा म्हणते अंनिस
हत्या करुनी भ्याड पळाले तोंड लपवुनी
निसर्ग त्यांना देइल धक्का म्हणते अंनिस
विज्ञानाचे मर्म जाणुनी शास्त्र जाण रे
कर श्रद्धेचा पाया पक्का म्हणते अंनिस
मात्रा – चोवीस=(आठ+आठ+आठ), २४=८+८+८.