Radif of this Ghazal is ‘Abir udhala Gulal udhala ‘. This Ghazal is written on some critical problems in society. In the last sher the poetess wants to live happily without anxiety, fear and thirst.
फाशी देउन जलाद रडला अबीर उधळा गुलाल उधळा
किती दिसांनी देव हासला अबीर उधळा गुलाल उधळा
शुद्ध बीज अन फळे गोमटी नवल कशाचे कौतुक कसले
चोरापोटी संत जन्मला अबीर उधळा गुलाल उधळा
वाघाने हरिणीला गिळता पाडस भोळे व्याकुळ होता
वाघिणीस बघ पान्हा फुटला अबीर उधळा गुलाल उधळा
मुका आंधळा बहिरासुद्धा दीन कोकरू बळी देतसे
लांडग्यास शेळीने टिपला अबीर उधळा गुलाल उधळा
भीती शंका तृष्णेमधुनी मुक्त ‘सुनेत्रा’ करना मजला
श्वास बोलला देहामधला अबीर उधळा गुलाल उधळा