फुलते खुलते मुग्ध मधुर सय
उडवुन लावी मरणाचे भय
जुळव करांना हृदयापाशी
जै जै अथवा करण्या जय जय
अभ्युदय करत तव आत्म्याचा
दीपक बन रे रत्नत्रयमय
शास्त्यामधला अस्त पळवुनी
चंद्रोदय अन हो सूर्योदय
चाफा हिरवा पिवळा धवला
हसतो म्हणतो विसर अता वय
त्या लपलेल्या काढ अहंला
फळ मिळवाया सुंदर रसमय
व्यवहाराला चोख ‘सुनेत्रा’
शक्ती इतुका करिते निश्चय
वृत्त – गा गा गा गा, गा गा गा गा.