Akasharganvrutta used in this Ghazal is GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA LA. In this ghazal the poetess says, I have tried my best to get answers of painful questions.
अंगार पेटलेला मी पाहिला तुझ्यात
तापून लाल वारा झाला निळा तुझ्यात
निशब्द हुंदक्यांनी काळीज गोठताच
सारी अबोल गाणी फुलली फुला तुझ्यात
फांदीस नारळाच्या बांधू नकोस दोर
ह्रदयास बांधलेला आहे झुला तुझ्यात
मातीस गंध येतो पडता खुळा वळीव
खजिनाच कस्तुरीचा सामावला तुझ्यात
प्रश्नास टोचणाऱ्या मी लाविले धसास
अन ताज गझलचाहा साकारला तुझ्यात
वृत्त- गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.