आज माझ्यासवे गझल होशील तू
कृष्ण मेघांपरी सजल होशील तू
वेड मोठे जरी सहज पेलेन मी
साथ देण्या मला तरल होशील तू
संगतीने तुझ्या काव्य आले घरी
शब्द-चित्रातले नवल होशील तू
वाट पाण्यातली सुगम होईल रे
देठ होईन मी कमल होशील तू
प्रेम सौख्यामधे चिंब भिजणार मी
जाळण्या वासना अनल होशील तू
स्त्रग्विणी (अक्षरगणवॄत्त)
लगावलीः गालगा गालगा गालगा गालगा
मात्राः २१२ २१२ २१२ २१२ = २०