आधी वादळ मुक्त फाकडे
नंतर गारा… घाल साकडे …
घाल साकडे वळीवाला तू …
येताना तो ऊर धडाडे
मेघ धावतील सैरावैरा …
बिजलीचा मग चढेल पारा …
कडाडता ती फुटुन हुंदके …
जलद स्फुंदतिल हलके हलके
काही धारा काही गारा…
मौन मूक होइलग वारा …
तप्त धरेवर बरसत बरसत…
गाईल गाणे पाऊस नाचत
मृदगंधाचा सुगंध प्राशुन …
मन माझे ग जाईल हर्षुन
येना वळीवा येना वळीवा…
वळचणीस बघ घुमे पारवा …