In this ghazal poetess says, “I will choose only my favourite songs now. I will sing these songs only. On this different path I will certainly bloom.” In this ghazal it is mentioned that nowadays, mothers don’t want to give birth to the girl child. If we commit bad deeds today, we certainly will get their bad fruits tomorrow. If we do good deeds today, we will be able to reap their benefits tomorrow.
आवडीचे गीत माझे, मी अता म्हणणार आहे;
वेगळ्या वाटेवरी त्या, मी पुन्हा फुलणार आहे.
मारुनी कन्येस गर्भी, पांडवा ती जन्म देते;
पण उद्या ना पांडवांना द्रौपदी वरणार आहे.
सोवळे नेसून कोणी, म्हणतसे नच त्यातला मी;
ओवळी पण नजर काळी, का कुठे लपणार आहे?
आत कोणी बोलतेरे, ऐक आता जाग तूरे;
काल जे तू कर्म केले, ते उद्या फळणार आहे.
श्वास माझा तू ‘सुनेत्रा’, रंग का मग तू नसावे?
रंगुनी रंगात तुझिया, चिंब मी भिजणार आहे.
वृत्त- गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा.