This ghazal is written in akshargan vrutt. Vrutt is GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA GAA.
आषाढ मेघ गर्जे बिजली कडाडतेरे
काळ्या कड्यावरूनी धारा धबाबतेरे
मेंदीत रंगलेल्या या कुंतलात माझ्या
ही सांज केशरी अन शुभ्रा खळाळतेरे
देऊन ऊन आता घेऊ नको परीक्षा
भट्टीत घातल्यावर सोने झळाळतेरे
मध्यान्ह तप्त सुंदर वारा सुसाट धावे
पंखावरून त्याच्या पुष्पक भरारतेरे
केलेस वार तूही केलेत वार मीही
रक्तापरी सुगंधी तृष्णा भळाळ तेरे
वृत्त – गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.