हसण्याचे किती प्रकार सुंदर
पाहुनी लिहिती हुशार सुंदर
कशास घुसळुनी मिळते लोणी
कुलूपबंद कर विचार सुंदर
दशधर्मातील सहा पुरवण्या
शोधा त्यातील नकार सुंदर
स्वगतामधूनी मुक्त व्हावया
ज्योत समईची रफार सुंदर
पंचमेरूचे शिखर गाठण्या
वेलांटीयूत उकार सुंदर
मात्रा -सतरा=( नऊ+आठ), १७=९+८