किती जाहल्या चुका कुणाच्या मोजत बसले नाही
हिशेब असला ठेवुन हृदयी भांडे भरले नाही
कितीक पात्रे घासघासली आतुन बाहेरूनी
साठवुनी जल गढुळ खरकटे तयांस धुतले नाही
आले नाही नळास पाणी शुद्धीलाही जेव्हा
विहिरीवरुनी केल्या खेपा लोळत पडले नाही
क वळीवाचे गारांमधले भरून हौदामध्ये
कोरफडीची बाग फुलविली ओटे पुसले नाही
वाळा घालुन माठामध्ये उदक सुवासिक केले
नारळ फोडुन डबक्यापुढती धोंडे पुजले नाही
गझल – मात्रावृत्त (मात्रा २८)