In this Ghazal(24 matras) the poetess says, I want to become free from all troublesome bondings and I want to flow freely as my own wish. In the last stanza(makta) our inner voice(soul) says, ‘I am a free soul. You should listen my voice carefully and leave your selfish emotions(kashhay- Mad, Matsar, Lobh, Krodh, Mayaachar etc) and be happy forever.
उधाणलेली लाट धुंद मी प्राश मला तू
तप्त धरेचा वळीव गंध मी प्राश मला तू
कुणी फिरविते कुणी बांधते मज नाचवते
तोडुन येइन सर्व बंध मी प्राश मला तू
वृत्त छंद अन अलंकार मी उधळुन देते
खळाळणारा मुक्तछंद मी प्राश मला तू
गळेन आणिक फुलेन पुन्हा तुझ्याचसाठी
हवाहवासा प्रेम-फंद मी प्राश मला तू
तव गंधाने मुकी जाहले बहिरी बनले
बनले आहे अता अंध मी प्राश मला तू
राजहंस मी मम हुंकारा ऐक सुनेत्रा
सोड रिपुंना आत्मगंध मी प्राश मला तू