In this ghazal the message to look positively at our surrounding is given. There are beautiful, colourful roses in the garden. The sky is full of blue clouds. The bright sun is shining in the sky. So don’t sing the songs of a broken heart.
गझलसंग्रह-दिडदा दिडदा
कवयित्री-सुनेत्रा नकाते
माधवी प्रकाशन, १३/४, लक्ष्मीनारायणनगर, एरंडवणे, पुणे-४११००४
उन्हाच्या फुलांचा थवा अंगणाला
नको तू स्मरू कालच्या पावसाला
कशाला हवे ते गुलाबी उखाणे
निळे मेघ भिडता असे लोचनाला
नको या सुरांचे उगा गुंजणे हे
इथे शांतता ही असे राहयाला
दिशांचे कुठे काय हरवून गेले
मिळाले तुला का पुसे अंबराला
मुक्याने झऱ्याशी जरी बोलले मी
कशाने तरी पूर शब्दास आला
मनाची कवाडे नको आज झाकू
खुले मुक्त वारे तुझ्या उंबऱ्याला
पुराण्या क्षणांचे नवे गीत झाले
कुणी आज यावे पुन्हा गावयाला
वृत्त- ल गा गा, ल गा गा, ल गा गा, ल गा गा.