This Ghazal is written in matravrutt. It is written in sixteen(16) matras. The word ‘mee'(मी) in the second line of Matala(first sher) stands for ego in human beings.
एक पाहिले एक ऐकिले
किती किती ‘मी’ तुला टोचले
पाडस माझे सशास घेउन
सूर्यावर बघ अता पोचले
बरेच झाले तसेच केले
ओघळलेले रक्त पेरिले
लोचन डोळे नयन नेत्र घन
चक्षू माझे तृप्त जाहले
आज ‘सुनेत्रा’ मुक्तछंद जल
मृग पकडाया धाव-धावले