एक साधी सरळ कविता
माझ्या तुमच्या लेकींसाठी
अधिक सुख मिळूदे भावास
म्हणून झटणाऱ्या बहिणींसाठी ….
भाऊ जपतो आईला
आई त्यांच्या बापाला
आईबाप जिवंत ठेवतात
लेकींसाठी माहेराला….
माहेराच्या वाटेवरचे
काटे कधी बोचत नसतात
सासरघरची कळ्या फुले
जिवाला जीव लावत असतात….
सासर असतं लेकींसाठी
काम धाम करण्यासाठी
हातावरच्या रेषांना
सुरेख वळण देण्यासाठी….