कळते वळते – KALATE VALATE


This ghazal is written in maatraavrutt(32 matraas). Here Radeef is valate(वळते) and kaafiyaas are kalate, falate, jalate( कळते, फळते, जळते) etc.

नीर क्षीर जे विवेक जपती त्यांची भाषा कळते वळते
कुरुप मनाची कुरुप गोष्टही त्यांच्यासंगे फळते वळते

शब्दांमध्ये भरून कटुता कुणी भिजवुनी तयांस पिळता
पीळ काढुनी ऊन देउनी वीष त्यातले जळते वळते

मधुर भावना मुग्ध निरागस काव्यामधुनी उमलुन येता
क्षुधा वासना सुप्त मनातिल कधी उगाचच चळते वळते

सरळ उमलते सरळ वाढते सरळच सारे जरी भासते
कशामुळे पण फूल प्रीतिचे मनास अपुल्या छळते वळते

कांचेसम जी वाट स्वच्छ पण असे निसरडी कुणा न भावे
कुणी फिरस्ते सहज तुडविता पुन्ह-पुन्हा तिज मळते वळते

मात्रा वृत्त – ८+८+८+८=३२ मात्रा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.