ये सई हाक मार
पुन्हा एकदा अंगणातून
धावत पळत येईन मग
वह्या पुस्तके सांभाळून
हवा भरू सायकलीत
कोपऱ्यावरच्या दुकानात
तुझी सायकल माझी सायकल
निघेल केवढ्या तोऱ्यात
चढ येता नको उतरणे
पायडल मारू जोरात
मागे टाकू टवाळ कंपू
भरारणाऱ्या वाऱ्यात
आलं कॉलेज चल उतर
सायकल लावू स्टॅंडला
बसून चार तासांना
दांडी मारू प्रॅक्टिकलला
बागेमधल्या झाडाखाली
बसून खरडू जर्नल
गप्पा-गोष्टी करत भरवू
कवितांची मैफल….