This Ghazal is written in maatraa vrutta. It is written in sixteen(16) maatraas.
In this Ghazal the poetess says, I want happiness in the whole world. I want to see the happiness in the whole world.
सुखात मी अन सुखात सारे
मला भावते असेच वारे
नवल कशाचे काळच सुंदर
धरणीवरती शशधर तारे
मी सर्वांवर प्रेमच केले
जरी म्हणाले अरेस कारे
नकोस थांबू पळभर येथे
जा दु:खा तू जारे जारे
बनोत सारे जीव मुमुक्षू
म्हणता देही मधुर शहारे