सुस्त नाही मस्त आहे
मी मराठी चुस्त आहे
बहरले लावण्य माझे
भोवताली गस्त आहे
वाहनांचा वेग नडतो
जीव येथे स्वस्त आहे
श्वानही वेळेत येतो
लावलेली शिस्त आहे
संस्कृतीला जपत म्हणते
हात नाही हस्त आहे
खीर ना पात्रात उरली
जाहली ती फस्त आहे
सुंदरा हसते ‘सुनेत्रा’
कुरुपतेचा अस्त आहे
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा.