श्रुत-पंचमीच्या दिनी
जीव वाजे झिनीझिणी
पुष्पदंत भूतबली
दर्शनात मग्न कळी
निरांजन माझ्या हाती
पंचप्राण माझे गाती
आदिनाथ जिनेश्वर
मुक्त शांत कैलासावर
सिद्धशिला प्राप्त करुनी
वीस जिन सम्मेदावर
वासुपुज्य चंपापुरी
तीच त्यांची मुक्तीगिरी
गिरणारी नेमीनाथ
मस्त घाट मोक्षपाथ
महावीर पावापुरी
रम्य शुद्ध मुक्ती खरी
कोपरा तो पाकघरी
तीर्थंकर वेदीवरी
मंदिरात आत्मज्योत
तीच कृष्णामाई स्त्रोत