केवळ आत्मा शरण्य आहे – KEVAL AATMAA SHARANYA AAHE


In this Ghazal(16 matras) the poetess says, Our father and Mother are our true Guru and Guide. God lives in our own Heart.

मात-पित्यांना नमन करावे
गुरु म्हणोनी चरण पुजावे

प्रेमच देते श्वास जगाया
त्या प्रेमाने धरण भरावे

प्रेमामध्ये  कशास संशय
आशंकेचे हरण करावे

देव न लपतो हृदयी वसतो
सदा मानसी स्मरण असावे

कमलावरल्या दवबिंदूसम
वाणी म्हणजे सुमन असावे

केवळ आत्मा शरण्य आहे
दुजापुढे का शरण असावे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.