This Ghazal is written in Matravrutta(16 matras). In this Ghazal the poetess says, only our soul is pure.
मिरवाया भाळावर टिकली
गीते माझी तुजला दिधली
वाट पाहुनी तुझी सख्यारे
डोळ्यांमधली स्वप्ने निजली
उभ्यानेच मी प्रवास केला
माझी पहिली गाडी चुकली
डोहाळे ना मज गोडाचे
हवी हवीशी खमंग चकली
केवळ आत्मा शुद्ध सुनेत्रा
शुभ-अशुभाचे ही फळ नकली