ये उन्हा ताप रे मौन तू सोड रे
प्रीतिचे ते जुने गौप्य तू फोड रे
ढेकळे जाहली या मृदू मातिची
नांगरू शेत हे औत तू जोड रे
वर्षता मेघ हे हासना खदखदा
पावसाची करुन मौज तू गोड रे
छप्पराच्यावरी सूर्य हा बागडे
यावया किरण तलि कौल तू तोड रे
ना जिना त्या घरा कैदखाना जणू
मुक्तता व्हावया सौध तू तोड रे
वृत्त – गा ल गा, गा ल गा, गा ल गा, गा ल गा.