खरे काय आहे बरे काय आहे
कळावे तुलारे तुझे काय आहे
तुला पाहिले मी तुला ऐकले मी
तरी जाणलेना भले काय आहे
गुपीते मनाची जुनी रेखताना
जरा अनुभवावे नवे काय आहे
इथे पूर्ण नाही कुणाचेच काही
तरी आस शोधे पुरे काय आहे
किती मोह तुजला उणे शोधण्याचा
अता अधिक शोधू खुले काय आहे
नसे तू नसे मी इथे रे नियंता
कसा शोध घ्यावा कुठे काय आहे
इथे आवडे ते करावे भरावे
नियम हाच जाणा नवे काय आहे
वृत्त – ल गा गा, ल गा गा, ल गा गा, ल गा गा.
2 responses to “खरे काय आहे – KHARE KAAY AAHE”
Sundar gazal. Khup awadali. Wruttache naaw bhujang prayat dilech nahi. Nusatich lagawali lihili ahe.
छान गझल ….
गेयता आणि शब्दयोजना विलोभनीय …..
वाह वा !
कुणाचा सलोखा .. कुणाची टवाळी ..
रडायास लावी .. हसे काय आहे ।