This Ghazal is written in akshargan vrutt.
Vrutt is LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA.
Here radif is lagala(लागला) and kafiyas are radoo, udoo, adoo, zadoo, saduu etc.
खुळा शोक धो धो रडू लागला
तळीचा फुपाटा उडू लागला
बघा झेप घेती नभी पाखरे
कुणी उंबऱ्याशी अडू लागला
कशाने फुलावा अहंकार हा
उन्हाने फुलोरा झडू लागला
जरी एक आंबा असे नासका
फळांचा ढिगारा सडू लागला
किनाऱ्यास होडी तिथे लागता
पुराने किनारा बुडू लागला
जरी सत्य आहे तुझे बोलणे
तरी डोस त्यांना कडू लागला
निघाल्या सरी श्रावणाच्या घरी
सडा मौक्तिकांचा पडू लागला
वृत्त- ल गा गा, ल गा गा, ल गा गा, ल गा.