गडद निळे गडद गडद आभाळ सावळे झाले
काळ्या काळ्या जलदांनी नभ भरुनी आले
मौक्तिक माळा घालुन सजल्या श्याम मेघना
शीळ घालतो मारुत मंजुळ खग घेती फांदीवर ताना
झरझर झरझर झरती धारा टपटप टपटप पानांवरती
मुदगंधाचा सुगंध प्राशुन शब्द उधळले पानांवरती
गोळा करुनी शब्द अंजलीत टपोर गजरा कुणी बनविला
माय आठवे सुंदर माझी तिनेच गजरा असा बनविला